झिंदवाडा : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. गुन्हा केल्यानंतर त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. महुलझीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोदल कछार गावात ही घटना घडली आहे. या घटनेत कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी हा कुटुंबातीलच सदस्य असून तो मानसिकरित्या आजारी होता. काल रात्री त्याने भाऊ, वहिनी, पत्नी आणि लहान मुलासह कुटुंबातील 8 जणांची हत्या केली. त्यानंतर गावापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या नाल्याजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत एक लहान मुलगा जखमी झाला आहे. तसेच या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.