मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीकडून मोठा दणका बसला आहे. ईडीने राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांचे अलिबागमधील ८ भूखंड, दादरमधील १ फ्लॅट जप्त केले आहेत.
संजय राऊत यांना ईडीच्या कारवाईची पुर्वकल्पना होती, असे विधान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सोमय्या पुढे म्हणाले की, पोलिसांचा माफिया म्हणून वापर करून कारवाई टाळता येणार नाही. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्यात संजय राऊत यांचा रोल काय आहे याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोमय्यांनी केली. राऊतांनी ५५ लाख परत केले होते. ईडीची कारवाई टाळता यावी यासाठी त्यांचा खटाटोप सुरू होता, आरोपही राऊत यांनी यावेळी केला.