Wednesday , December 10 2025
Breaking News

मोदींच्या ३.० कॅबिनेटमधील मंत्र्यांची यादी..

Spread the love

 

कर्नाटकातून ६ जणांना संधी

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्यामुळे संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही शपथ घेऊ शकतात. सध्या मोदी ३.० च्या मंत्रिमंडळासाठी अनेक नेत्यांची नावे पुढे आली आहेत.

मोदी सरकार ३.० मध्ये या खासदारांच्या नावांची चर्चा

१) पियुष गोयल – भाजप (महाराष्ट्र)

२) नारायण राणे – भाजप (महाराष्ट्र)

३) नितीन गडकरी – भाजप (महाराष्ट्र)

४) संदिपान भुमरे – शिवसेना शिंदे गट (महाराष्ट्र)

५) प्रतापराव जाधव – शिवसेना शिंदे गट (महाराष्ट्र)

६) प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (महाराष्ट्र)

७) जी किशन रेड्डी – भाजप (तेलंगणा)

८) बंदी संजय – भाजप (तेलंगणा)

९) एटाला राजेंद्र – भाजप (तेलंगणा)

१०) डीके अरुणा – भाजप (तेलंगणा)

११) डॉ. के लक्ष्मण – भाजप (तेलंगणा)

१२) राम मोहन नायडू – टीडीपी (आंध्र प्रदेश)

१३) हरीश – टीडीपी (आंध्र प्रदेश)

१४) चंद्रशेखर – टीडीपी (आंध्र प्रदेश)

१५) पुरंदेश्वरी – भाजपा (आंध्र प्रदेश)

१६) रमेश – भाजप (आंध्र प्रदेश)

१७) बाळा शौरी – जनसेना पक्ष

१८) सुरेश गोपी – भाजप (केरळ)

१९) व्ही. मुरलीधरन – भाजप (केरळ)

२०) राजीव चंद्रशेखर – भाजप (केरळ)

२१) एल मुर्गन – भाजप (तामिळनाडू)

२२) के अन्नामलाई – भाजप (तामिळनाडू)

२३) एचडी कुमारस्वामी – जेडीएस (कर्नाटक)

२४) प्रल्हाद जोशी – भाजप (कर्नाटक)

२५) बसवराज बोम्मई – भाजप (कर्नाटक)

२६) जगदीश शेट्टर – भाजप (कर्नाटक)

२७) शोभा करंदलाजे- भाजप (कर्नाटक)

२८) डॉ.सी.एन. मंजुनाथ – भाजप (कर्नाटक)

याशिवाय एनडीएचा आणखी एक महत्त्वाचा पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडलाही मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. जेडीयूच्या दोन खासदारांना मंत्री केले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा खासदार लालन सिंह आणि राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांना केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *