Tuesday , September 17 2024
Breaking News

लोकसभा अध्यक्षपदावरून भाजप बॅकफूटवर

Spread the love

 

नवी दिल्ली : देशाच्या 18व्या लोकसभेसाठी 26 जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे लोकसभेचे नवीन अध्यक्ष कोण होणार? याबाबत चर्चा सुरू आहे. भारताच्या विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे की भाजपने आपल्या मित्र पक्षाला संधी दिली पाहिजे. एनडीए सरकार असल्याने यावेळी लोकसभा अध्यक्षपद महत्वाचा घटक असेल.

मागील दोन सरकारच्या तुलनेत भारतीय जनता पक्ष यावेळी पूर्णपणे मित्रपक्षांवर अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या, म्हणजे बहुमताच्या आकड्यापेक्षा 32 जागा कमी आहेत. आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष आणि बिहारमधील नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड हे भाजपचे सहयोगी आहेत.

टीडीपी नेत्यांचे म्हणणे आहे की लोकसभेच्या उमेदवाराचा निर्णय एनडीएच्या मित्रपक्षांनी एकत्रितपणे घ्यावा, तर जेडीयू नेते केसी त्यागी यांनी म्हटले आहे की जनता दल युनायटेड भाजपने नियुक्त केलेल्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतो.

About Belgaum Varta

Check Also

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार

Spread the love  रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली : ‘अज्ञानातून प्रकाशाकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *