सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेमध्ये तब्बल १००० भाविकांना तीव्र उष्णतेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या सौदी अरबसह मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली आहे. या उष्णतेच्या लाटेचा हज यात्रेवरही गंभीर परिणाम झाला आहे. बुधवारी तब्बल ५५० हज यात्रेकरुंचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता या मृतांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांची संख्या सध्या एक हजारावर पोहोचली आहे.
इस्लाम धर्मामध्ये हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जायला हवं असं बोललं जातं. त्यामुळे जगभरातील लाखो मुस्लीम व्यक्ती हज यात्रेसाठी मक्केला जात असतात. सध्या हज यात्रा सुरु आहे. त्यासाठी लाखो यात्रेकरू तेथे दाखल झाले आहेत. हवामान बदलामुळे तेथील वातावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. तसेच हज यात्रेवरही त्याचे परिणाम होत असल्याचं दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta