
कार्तिक दीपोत्सवानिमित्त कार्यक्रम : महादेवाची पालखी प्रदक्षिणा
निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीत मधील महादेव मंदिरात सोमवारी (ता.७) रात्री कार्तिक दीपोत्सव साजरा झाला. त्यानिमित्त महादेव मंदिर सह सांस्कृतिक भवनात भाविकांनी दहा हजार दिवे लावले. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. त्यावेळी रेखाटलेल्या रांगोळ्या दीपोत्सवाचे खास आकर्षण ठरले.
प्रारंभी महादेवाच्या पालखीची प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतरमान्यवरांच्या उपस्थितीत महादेवाची आरती करण्यात आली. येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, संचालक पप्पू पाटील, श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर भाविकांनी दीपोत्सव साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहा हजार दिवे लावल्याने महादेव मंदिर परिसरात झगमगाट दिसून आला. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप झाले.
यावेळी चिकोडी येथील राजू नेर्ली यांनी आकर्षक रांगोळ्यामधून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती महादेवाची मूर्ती गणेश मूर्ती साकारली होती. या रांगोळ्या पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी गर्दी केली होती. मंगळवारी (ता. ८) दिवसभर रांगोळ्या पाहण्यासाठी खुले राहणार आहेत. या रांगोळ्या रेखाटण्यासाठी नेर्ली यांना बारा तासाचा कालावधी लागला. नागरिकांनी या रांगोळ्या पाहून कलाकाराचे कौतुक केले.
यावेळी केली संस्थेचे संचालक अमर बागेवाडी, समीर बागेवाडी, सराफ उद्योजक रवींद्र शेट्टी, रवींद्र कोठीवाले, व्हीएसएमचे संचालक संजय मोळवाडे, मल्लिकार्जुन गडकरी, रवींद्र चंद्रकुडे, विजय चंद्रकुडे, एम.पी. पाटील, कल्लाप्पा खोत, रावसाहेब पाटील, अण्णासाहेब जाधव, सदानंद चंद्रकुडे, माजी नगरसेवक रवींद्र चंद्रकुडे, बाबासाहेब चंद्रकुडे, महात्मा बसवेश्वर संस्थेचे संचालक महेश बागेवाडी, डॉ. महेश ऐनापुरे, गणेश खडेद, वज्रकांत सदलगे, शिवकांत चंद्रकुडे, आप्पासाहेब अडीपवाडे, बाळकृष्ण वसेदार, लक्ष्मण ठगरे, सुकुमार गुरव, ॲड. महेश दिवाण, कृष्णा गुरव, अरुण भोसले यांच्यासह श्री गणेश मंडळ, पालखी मंडळ, एस पी ग्रुप, निलांबिका महिला बळगच्या कार्यकर्त्यासह भावीक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta