चार दिवसाचा अल्टिमेट : अन्यथा आंदोलन
निपाणी (वार्ता) : आम आदमी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी आम आदमी पक्षाचे निपाणी विभाग प्रमुख डॉ. राजेश बनवन्ना म्हणाले, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालणारा कारखाना आहे. त्याचा सर्व शेतकऱ्यांना झाला पाहिजे. ऊसाचा उतारा चांगला असल्याने शेतकऱ्यांना प्रति टन ३५०० रुपये दर मिळाला पाहिजे. उसापासून बगस मोलिसिस सिससह अनेक उपपदार्थ तयार होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिष्ठान ३५०० दर देणे शक्य आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एन. आय. खोत, यांनी आज पर्यंत मी काही कारखानदारांनी ऊसाचा यंदाचा दर जाहीर केलेला नाही. तरीही यंदाच्या हंगामातील ऊस तोडणी सुरू केली आहे. शुक्रवारपर्यंत दर जाहीर करून शेतकऱ्यांना सहकार करावे. अन्यथा होणाऱ्या परिणामाला कारखाना प्रशिक्षण जबाबदार राहील असा इशारा दिला. यावेळी संचालक रामगोंडा पाटील यांनी निवेदन स्वीकारून प्रशासनाला पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी डॉ. राजेश बनवन्ना, स्वाभिमानी संघटनेचे प्रा. एन. आय. खोत, आदर्श गिजवणेकर, वाशिम पठाण, राजू हिंग्लजे, सदाशिव पोवार, प्रा. कांचन बिरनाळे, लतिफा पठाण, प्रकाश माने, तात्यासाहेब पाटील, शकुंतला तेली, प्रतिभा पोवार, मलगोंडा तावदारे रावसाहेब खोत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta