
संभाजी राजे चौकात मानवी साखळी : तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : माजी मंत्री व केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी हे सर्व जातीधर्मांचा आदर करणारे आहेत. त्यांनी केलेले वक्तव्य हे कोणत्या धर्माविरोधात नव्हते. तर केवळ एका शब्दाचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. त्याला ऐतिहासिक व साहित्यिक आधार होता. असे असताना काही भाजप नेते सतीश जारकीहोळी यांची बदनामी करत आहेत. त्याचा निषेध करत गुरुवारी (ता. १०) सतीश जारकोळी यांच्या समर्थनार्थ विविध संघटनांनी विराट मोर्चा काढला. तसेच याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रवीण कारंडे यांना दिले.
प्रारंभी येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात जारकीहोळी समर्थकांनी मानवी साखळी केली. यानंतर मुख्यमार्गावरून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. सतीश जारकीहोळी यांचा विजय असो, मनुवादी सरकारचा अधिकार असो यासह महापुरुषांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यापुढे जारकीहोळी यांची बदनामी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
सर्व जातीधर्माला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या संविधानाचा विचार सतीश जारकीहोळी हे प्रत्येकाच्या मनात रुजवत आहेत. त्यांनी कोणत्याही धर्मावर टीका न करता केवळ एका शब्दाचे स्पष्टीकरण सांगितले. असे असताना मनुवादी संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या काही भाजप नेत्यांनी जारकीहोळी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करून आपले बौद्धिक दारिद्र्य दाखवून दिले आहे. या विषयावर बौद्धिक संवाद होण्याची गरज असताना विनाकारण वाद घालून अन्यायाविरोधात उठणारा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सरकार व भाजप नेते करत आहेत. त्याचा निषेध करत असल्याचे पत्र तहसीलदारांमार्फत राज्यपालांना पाठविण्यात आले. प्रभारी तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी निवेदन स्वीकारून ते पुढे पाठविण्याची ग्वाही दिली.
यावेळी अशोक लाखे, महेश कांबळे, सुशांत खराडे, संतोष दोडमणी यांनी विचार व्यक्त केले.
मोर्चामध्ये नवनाथ चव्हाण, प्रशांत नाईक, दीपक वळीवडे, अशोक माने, प्रशांत हांडोरे, रवींद्र इंगवले, हरीश सनदी, पैलवान सुभाष कांबळे, राहुल माने, अस्लम शिकलगार, महादेव कोल्हापूरे, जीवन घस्ते, अशोक कांबळे, डॉ. विक्रम शिंगाडे, असलम शिकलगार, प्रशांत नाईक, सिताराम पाटील, रवींद्र श्रीखंडे, ओंकार माने, प्रशांत मदने, संभाजी मुगळे, विश्वास माळी, विक्रम करनिंग, विश्वनाथ कांबळे, अरविंद घटी, रोहिणी दीक्षित, रेखाताई कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta