मडिवाळ समाजाचा स्तुत्य उपक्रम
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष उद्योजक अभिनंदन रावसाहेब पाटील यांच्या 47 वा वाढदिवस निमित्त येथील मडिवाळ समाजाच्या वतीने समाजाचे प्रमुख पैलवान बाळासाहेब माडिवाळ व मित्रपरिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. त्यांच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम राबवून समाजाने आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
प्रारंभी अजित कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
याप्रसंगी बोलताना बाळासाहेब मडिवाळ यांनी, आमचे नेते आधारस्तंभ, अभिनंदन पाटील यांचा वाढदिवस सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते. कारण त्यांच्या वाढदिनी प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येते. आज अरिहंत उद्योग समूहाने सहकार क्षेत्र बरोबर सामाजिक क्षेत्राला ही प्राधान्य दिले आहे. उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन रावसाहेब पाटील यांनीही बोरगाव व निपाणी परिसरात आपला सामाजिक कार्य सातत्याने ठेवून सर्वसामान्यांचा विकास साधला आहे. मुलांना मोफत वह्या वाटप, वृक्षारोपण, जानकी वृद्धाश्रमात धान्य वाटप गरजूंना आर्थिक सहाय्य, प्राथमिक आरोग्य केंद्र फळे वाटप, यासह विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येतो. आज आपण समस्त मडिवाळ समाजाच्या वतीने त्यांचा वाढदिवस कार्यक्रमानिमित्त सामाजिक उपक्रम राबविले असल्याचे सांगितले.
माजी ग्राम पंचायत अध्यक्ष मारुती निकम, सुरेखा घाळे, डॉ. महावीर घाळे, पिरगोंडा पाटील, अशोक नेजे, शिवानंद राजमाने, शिशिर सातपुते, डॉ. शिवप्रसाद मडिवाळ, आरती बंकापुरे, समेद पाटील, शंकर मडिवाळ, महेश चौगुले, आणापा मडिवाळ, बबन निकम, विनोद मडिवाळ, अजित कांबळे, केंपु टोन्ने, यांच्यासह आशा कार्यकर्ते, दवाखाना कर्मचारी सह मडिवाळ समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta