Sunday , July 26 2026
Breaking News

पाकाळणी कार्यक्रमाने निपाणी उरुसाची सांगता

Spread the love

चव्हाण वारसासह मानकर -याकडून नैवेद्य :१५ दिवस चालणार कंदुरीचा कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण यांनी स्थापन केलेल्या पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांच्या उरुसाला रविवारी (ता.६) पासून सुरूवात झाली होती.
रविवारी (ता.७) संदल बेडीवाल्यांच्या भर उरूस झाला होता. त्यानंतर चव्हाण वाड्यात चव्हाण वारस व मानकरी ऊरुस कमिटी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पाकळणी कार्यक्रम करून निपाणी उरुसाची सांगता करण्यात आली.
श्री संतबाबा महाराज चव्हा प्रस्थापित महान अवलिया हजरत पिराणेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरूसा निमित्ताने चव्हाण वारसा तर्फे संग्रामसिंह देसाई, रणजितसिंह देसाई, सरकार पृथ्वीराज, चव्हाण व समस्त साळी समाज यांच्या हस्ते लवाजमा मानकरी यांच्या उपस्थितीत दरग्यास अभिषेक, बाहेरील समाधीस व चव्हाण वाड्यातील समाधीस अभिषेक घालून दर्गा धुवून पाकाळणी विधी पार पडला. गोडा नैवेद्य, प्रसाद व मानकरी यांच्या रवानगीने उरुसाची सांगता झाली.
उरूसानिमित्त बैलगाडी शर्यती, घोडा बैलगाडी शर्यती, घोडा गाडी शर्यती, श्वान पळविणे, कव्वालीचे जुगलबंदी, कुस्ती मैदान पार पडले. नैवेद्य अर्पण व दर्शनासाठी दर्गा परिसरात भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळाली. गुरुवारी (ता.१०) मानाच्या फकीरांची रवानगी करून चव्हाण वारसाच्या हस्ते भंडारखाण्याचे साहित्य सुपूर्द केले.
यावेळी बाबासाहेब उर्फ रमेश देसाई सरकार, बाळासाहेब देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण, सुजय देसाई सरकार, संग्राम देसाई सरकार, रणजीत देसाई सरकार, राजूबाबा निपाणीकर, संजय माने, विवेक मोकाशी, शरदचंद्र मळगे, बाळू पोतदार, अजित भोकरे, बंडा गंथडे, बाबासाहेब सुतार, सनी साळुंखे, अतिश सुतार, संतोष गंथडे, प्रभाकर पाटील, जयराम मिरजकर, सदाशिव डवरी, यांच्यासह मानकरी नागरिक उपस्थित होते.
अनेक वर्षांची परंपरा असलेल्या हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला हा उत्सव शांततेत पार पडला. उरूस काळात चिकोडीचे उपअधीक्षक बसवराज यलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षिका कृष्णवेणी गुर्लहोसूर आणि सहकार्यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *