सुभेदार मेजर सुरेश बरगाली : निपाणीत भारतीय पूर्व मार्गदर्शनपर व्याख्यान
निपाणी (वार्ता) : भारतीय लष्करामध्ये भारतीय होण्यासाठी इंडियन आर्मी शिपाई पदापासून अधिकाऱ्यापर्यंत विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. शैक्षणिक पात्रतेनुसार त्याचा सहज लाभ घेणे शक्य झाले आहे. त्यासाठी मार्गदर्शन अत्यंत गरजेचे बनले आहे. लष्करामधील भरतीसाठी वीरत्व आणि सहास महत्त्वाचे आहे,असे मत बेळगाव मराठा लाईट इन्फंट्रीचे सुभेदार मेजर सुरेश बरगाली यांनी व्यक्त केले. येथील दिवंगत डॉ. ए. टी. बनवान्ना यांच्या प्रथम स्मृतिनिमित्त रविवारी येथील ब्रम्हनाथ सौहार्द संस्थेच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
प्रारंभी डॉ. राजेश बनवान्ना कुटुंबीयातर्फे यांच्या हस्ते डॉ. ए. टी. बनवान्ना यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर डॉ. राजेश बनवान्ना यांनी स्वागत केले.
सुभेदार मेजर सुरेश बरगाली म्हणाले, गॅझेटेड ऑफिसर होण्यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थी पात्र आहेत. एनसीसी विद्यार्थ्यांना लष्करात भरतीसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. शत्रु विरोधात लढण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. त्यासाठी ताकद महत्त्वाचे आहे. कौटुंबिक समस्यांचा विचार न करता देशासाठी कार्यरत राहण्याची मानसिक तयारी ठेवावी. कर्नल, ब्रिगेडियर, लेफ्टनंट जनरल, जनरल ही पदे मिळण्यासाठी कठोर प्रयत्नांची गरज आहे.
लष्करातील कर्मचाऱ्यांना ५६ हजारापासून वेतन सुरू होते. त्यांच्या पदानुसार २ लाखावर वेतन जाऊ शकते. भारतीय सैन्य दलात भारत मातेचे रक्षण हेच एकमेव ध्येय असले पाहिजे. सैन्य दलात शाळा, दवाखाने या सर्व विविध ठिकाणी सुविधा दिल्या जात आहेत. आर्मी भरतीसाठी कधीही लाच घेतली जात नाही. प्रकारे रक्कम मागणाऱ्या नागरिकांपासून युवक व त्यांच्या पालकांनी सावध रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी डॉ. सुहास शहा यांनी डॉ. ए. टी. बनवन्ना यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. यावेळी सुभेदार अमोल बाबर यांनीही युवकांना मार्शल केले.
कार्यक्रमास डॉ. रवींद्र देवर्षी, देवचंद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अशोक डोनर, प्रा. कांचन बिरनाळे -पाटील, पद्मा बनवन्ना राजू हिंग्लजे, दीपक शिंदे, नंदन जाधव, निवृत्त जवान मयूर लकडे, नंदकिशोर कंगळे, लतिफा पठाण, आदर्श गिजवनेकर, प्रकाश माने, बी. एम. पाटील, सलीम बागवान यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील युवक व पालक उपस्थित होते. डॉ. सुनिता देवर्षी यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta