Sunday , July 26 2026
Breaking News

भटक्या कुत्र्यांचा मेंढ्यांवर हल्ला; 12 मेंढ्या ठार

Spread the love

 

बेळगाव : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने मेंढ्यांच्या कळपावर केलेल्या हल्ल्यात 12 मेंढ्या ठार तर 7 कोकरे बेपत्ता झाली. सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली.

सदर मेंढ्या यल्लाप्पा भरमा नरोटी, मल्लाप्पा कल्लाप्पा नरोटी आणि यल्लाप्पा मरेयप्पा उचगावकर रा. सुळगा (हिं.) यांच्या मालकीच्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हे तिन्ही मेंढपाळ बकऱ्यांना रिंगणात ठेवून जेवणास बसले होते. यावेळी 20 हून अधिक भटक्या कुत्र्यांच्या टोळीने मेंढ्यांवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात बारा मेंढ्या ठार झाल्या. तर बिथरलेल्या इतर मेंढ्या वाट मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळू लागल्या.

यावेळी बेनकनहळ्ळी गावात काहींनी मेंढ्यांना अडवले आणि मालकांना माहिती दिली. यानंतर संबंधित मेंढपाळांनी बेनकनहळ्ळी येथे जाऊन मेंढ्या ताब्यात घेतल्या. या घटनेमुळे तिन्ही मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने योग्य ती नुकसान भरपाई देण्याची विनंती त्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *