Share
डॉ. विलास पाटील : मगदूम वाचनालयातर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : गुणवत्तेला महत्त्व आणि मरणही नाही त्यामुळे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्यासाठी शिकले पाहिजे. कष्ट हे भांडवल आहे, डोकं चालवून कष्ट करता आले पाहिजेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड माहिती निर्माण केली आहे. त्याचा उपयोग करून घेण्याची गरज आहे. शरीराच्या लाडापेक्षा त्याग करायला शिकावे. ध्येयाशी चिकटून राहिल्यास यश मिळेल, असे मत डॉ. विलास पाटील यांनी व्यक्त
अर्जुनी येथील सुशीला मगदूम ग्राम वाचनालय तर्फे सिद्धी पाटील एम एस सी भाग एक (फिजिक्स विभाग ) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यार्थीनीकडून आपल्याला मिळालेल्या गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या रकमेतील रुपये दहा हजार किमतीचे मौल्यवान ग्रंथ वाचनालयास भेट दिले. यावेळी विलास पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच सुनील देसाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विलास पाटील (वरिष्ठ प्रकल्प संचालक सारथी, पुणे) होते.
सिध्दी पाटील हिने मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या दिव्या मिसाळ या विद्यार्थिनीस वाचनालयाच्या वतीने ६ हजार ररुपये किमतीची पुस्तके देण्यात आली. सिद्धी पाटील हिने विद्यार्थ्यांना आदर्श ठरणारा ग्रंथभेटीचा उपक्रम राबविल्याबद्दल वाचनालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला.वाचनालयाचे अध्यक्ष रमेश देसाई, वाचनालयाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
कार्यक्रमास प्रा. अमर शेळके, तुकाराम देसाई, कृष्णात पेडणेकर, बाजीराव चौगुले कार्यक्रम उपस्थिती – ग्रंथपाल जोतिराम मिसाळ, सुदाम देसाई, सज्जन कांबळे, जयसिंग कांबळे, उत्तम देसाई, राजाराम पेडणेकर, आनंदा उन्हाळे बाबुराव मिसाळ, अशोक कडुकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सचिव राहुल देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
के. एम. पेडणेकर यांनी आभार मानले.
Post Views:
459
Belgaum Varta Belgaum Varta