कोगनोळी : कोल्हापूर मुख्य बस स्थानक येथे शिवसेनेच्या वतीने कर्नाटक महामंडळाच्या बसेस वर जय महाराष्ट्र लिहिण्यात आले या पार्श्वभूमीवर कोगनोळी टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये महाराष्ट्र व कर्नाटक मुख्यमंत्री व अन्य नेते मंडळी सीमाप्रश्नावर टिपणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागात तणावाचे वातावरण निर्मिती होण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी महाराष्ट्रातील जत तालुका कर्नाटकात येण्यास तयार असल्याचे वक्तव केले. त्यांच्या या वक्तव्याला महाराष्ट्रातून तीव्र विरोध दर्शवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील मुख्य बस स्थानक येथे शिवसेनेच्या वतीने कर्नाटक महामंडळाच्या बस गाड्यांच्यावर जय महाराष्ट्र असा संदेश लिहून बस गाड्यांना काळे लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
सदर घटना लक्षात घेऊन सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण होण्याचे लक्षात घेऊन कर्नाटक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
शुक्रवार तारीख 25 रोजी सकाळी कोल्हापूर येथे कर्नाटक बसवर जय महाराष्ट्र लिहिल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा बंद होती. ती बस सेवा शनिवार तारीख 26 रोजी सकाळी सुरू झाल्याने प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
चिकोडी डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार व अन्य पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta