Tuesday , March 3 2026
Breaking News

सौंदलगा हायस्कूलमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

Spread the love

 

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद रावजी पवार साहेब यांच्या रयत मधील पन्नास वर्षाच्या कारकिर्दीबद्दल कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात स्कूल कमिटीचे चेअरमन रघुनाथ चौगुले हे अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमात प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक जे. एस. वाडकर यांनी केले.
यावेळी प्रमुख वक्ते रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व सिद्धेश्वर विद्यालय कुरली येथील विज्ञान शिक्षक एस. एस. चौगुले यांनी शरद पवार यांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेताना त्यांचे रयत मधील योगदान स्पष्ट केले.
या कृतज्ञता सप्ताहमध्ये विद्यालयात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या सांगता समारंभ दिवशी विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य अजित पाटील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. व्ही. यादव यांनी तर आभार एम. जी. बोरगे यांनी मांडले.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *