Sunday , September 20 2026
Breaking News

‘बनावट ट्विटर अकाऊंट’चा अमित शहांना संशय : अजित पवार

Spread the love

 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळला असताना बुधवारी संध्याकाळी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना बनावट ट्विटर अकाऊंटवरून झालेल्या ट्वीट्समुळे तणाव वाढण्यास हातभार लागल्याचा संशय अमित शाह यांनी व्यक्त केला. त्यामुळे दोन्ही राज्यांमधील वाद भडकवण्यासाठी नेमकं कोण कारणीभूत ठरलं? ही बनावट खाती नेमकं कोण चालवतंय? अशी चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांवरही आरोप केले जात असताना त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली आहे.
दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या
काल चर्चा झाली की यामागचा सूत्रधार कोण आहे? हे का घडलं? यात जाणीवपूर्वक कुणी बातम्या सोडल्या? त्यातून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊन या सगळ्या गोष्टी घडल्या. काहींना वाटतंय की हे विरोधकांनी केलं. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही नेहमीच राज्याच्या एकसंधतेला धक्का लागणार नाही हाच दृष्टीकोन ठेवत असतो. तरीही जर कुठली शंका केंद्राला वाटत असेल, दोन राज्यांतल्या प्रमुखांना शंका वाटत असेल तर त्यातलं दूध का दूध, पानी का पानी समोर आलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
यात खरंच कुणी मास्टरमाइंड असेल तर
खरंच कुणी यामागचा मास्टरमाइंड असेल, तर तो समोर यायला हवा. माझं मत आहे की बोम्मईंनी तसं वक्तव्य केलं नसतं, तर हा वाद वाढला नसता. त्यांच्या वक्तव्यातून राज्याच्या अस्मितेला धक्का लावण्याचं काम हे करत असल्याची भावना सीमाभागातील नागरिकांमध्ये निर्माण झाली. त्यातूनच हे सगळं घडलं असं माझं मत आहे, असंही अजित पवारांनी नमूद केलं.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *