Share
नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : ग्राहकांची लुबाडणूक थांबवण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील भारत वाइन शॉप व आशीर्वाद वाइन शॉप मध्ये प्रत्येक बाटलीमध्ये एमआरपी पेक्षा वाढीव दर घेऊन ग्राहकांची लुबाडणूक करीत आहेत. वाढीव दर न आकारता मूळ किमती प्रमाणे दारू विक्री करून ग्राहकांची लुबाडणूक थांबवावी. या दोन्ही वाइन शॉपमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीचे निवेदन बोरगाव नगर पंचायत मुख्याधिकारी पी. ए. कल्याणशेट्टी यांना निवेदन नागरिकांतर्फे देण्यात आले.
अनेक वर्षापासून बोरगाव येथे दोन वाइन शॉप चालू आहेत. त्या वाइन शॉपचा नागरिक व शेतकरी वर्गाला त्रास होत आहे. भारत वाइन दुकान समोर जैन समाजाची पवित्र जागा आहे. त्या जागेचे पावित्र या दारू दुकानमुळे नष्ट होत आहे. दुकानाच्या परिसरात असलेल्या शेतीत दारू बाटल्यांचा रोज खच पडत आहे. शेतात काम करत असताना अनेक शेतकरी वर्गाच्या पायात काचा घुसण्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत. याबाबत नागरिकांनी प्रत्यक्ष दोन्ही वाइन शॉप मध्ये नागरिकांनी जाऊन जाब विचारला. तरी नगरपंचायत, अबकारी खाते आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष भाऊसाब महाजन यांनी केली आहे.
सदरचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पी. ए. कल्याणशेट्टी यांनी स्वीकारून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या निवेदनाच्या प्रती अबकारी खात्याचे अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार तरीही मनमानी कारभार सुरूच राहिल्यास शहरातून मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशाराही महाजन यांनी दिला. यावेळी श्रेणिक जंगटे, शिवाजी तोडकर, जितेंद्र पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Post Views:
559