राजेंद्र वड्डर : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : एकीकडे देशातील लहान मोठ्या उद्योगांना आर्थिक मदत देऊन बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात येत आहे. पण मागासवर्गीय, दलित समाजातील लहान-मोठ्या उद्योजकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून त्यांना समस्येच्या खाईत ढकलत आहे. भाजप सरकारकडून मागासवर्गीय उद्योजकांच्याकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भोज जिल्हा परिषद पंचायत माजी सदस्य व कर्नाटक राज्य वड्डर समाजाचे उपाध्यक्ष राजेंद्र वड्डर यांनी केला. ते बेळगाव येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना निवेदन देऊन लक्ष देण्याची मागणी केली.
निवेदनातील माहिती अशी, बोरगाव येथे सरकारकडून औद्योगिक वसाहत वसवले आहे. येथे लहान- मोठ्या उद्योजकांच्यासह मागासवर्गीयांचे उद्योग धंदे उभारण्यासाठी संधी दिली. पण जवळी (टेक्स्टाईल) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे मागासवर्गीय उद्योजक समस्यांना सामोरे जात आहेत. जवळी विभागाच्या एस,एम,इ नियमानुसार ३.७५ कोटी शासनाकडून तर स्वतःकडून १.२५ कोटी असे ५ कोटी रुपयातून उद्योग व्यवसाय करण्यासाठी मुभा देण्यात आली. पण येडीयुरप्पा मुख्यमंत्री असताना अचानकच कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता पाच कोटीची योजना बंद करून दोन कोटीची योजना सुरू करण्यात आली. तरुणांनी बँकेच्या माध्यमातून कर्ज काढून पाच कोटींची रक्कम उद्योगात घातले. त्यामुळे आता बँकेचे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारी नियमानुसार आणि उद्योग मंजुरी पत्रात उद्योग धंद्यांना विद्युत बिलात ५० टक्के सवलत देण्यात आली. पण चार वर्षांपासून प्रत्येक कारखानदारच १०० टक्के विद्युत बिल भरत आहेत. यासाठी समाज कल्याण विभागात ४६ कोटी रुपये शिल्लक आहेत. पण विणकर विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे केले आहे. त्यामुळे बोरगाव येथील अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
मुख्यमंत्री बोम्मई यांची उद्योजकांनी भेट घेऊन निवेदन दिले. निवेदन स्वीकारून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विणकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पुढंच्या आठवड्यात समाज कल्याण विभाग अधिकारी, विणकर विभाग अधिकारी आणि बोरगाव येथील मिल व्यावसायिक यांची बैठक समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन बोम्मई यांनी दिले. यावेळी ब्राहत विणकर माग उद्योग सेक्रेटरी मृगेश निराणी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सी. सी. पाटील, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, माजी विणकर मंत्री श्रीमंत लातील, महेश कुमठोळी, अरिहंतचे अभिनंदन पाटील, दिगंबर कांबळे, शरद जंगटे, राजेंद्र वड्डर यांच्यासह उद्योजक आणि कामगार उपस्थित होते.