कोगनोळी : महाराष्ट्र हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने बेळगाव दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी तालुका निपाणी येथील दूधगंगा नदीवर त्यांना प्रवेश बंदी करण्यासाठी कर्नाटक पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
बेळगाव जिल्हाधिकारी यांनी त्यांना प्रवेश बंदी केली आहे. याच पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
खासदार धैर्यशील माने हे बेळगाव येथे होत असलेल्या हुतात्मा दिनानिमित्त सीमा लढ्यात हुतात्मा झालेल्या लोकांना अभिवादन करण्यासाठी जाणार होते.
कर्नाटक प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी त्यांना कर्नाटक प्रवेश बंदी केली.
सीमावासीय मराठी भाषिकांच्या दृष्टीने आजचा दिवस काळा दिवस समजला जातो. या दिवशी अनेकांनी हुतात्मे पत्करलेले आहे. या हुतात्म्यांना आज बेळगाव शहरासह खानापूर, निपाणी आधी ठिकाणी अभिवादन करण्यात येणार होते. काही कारणास्तव त्यांचा तो दौरा रद्द झाला.
दूधगंगा नदीवर 1 डीवायएसपी, 2 सीपीआय, 2 पीएसआय, 100 पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी आठ वाजल्यापासूनच दूधगंगा नदीसह टोल नाका परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांनी बंदोबस्ताला भेट दिली.
डीवायएसपी बसवराज यल्लीगार, मंडल पोलीस निरीक्षक संगममेश शिवयोगी, पीआय बी. एस. तळवार, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभार, आनंद कारिकट्टी यांच्यासह अन्य पोलीस तैनात होते.
Belgaum Varta Belgaum Varta