सौंदलगा : गुरुवार दि.19/1/2023 रोजी लाल बावटा बांधकाम कामगार संघटना शाखा आडी यांच्याकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पेंटर किटचे वाटप सीआयटीयु तालुका कमिटी सदस्य राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास बहुसंख्येने बांधकाम कामगार महिला व पुरुष उपस्थित होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. दिलीप वारके ग्राम पंचायत कामगार तालुका अध्यक्ष हे उपस्थित होते.
या प्रसंगी भाषण करताना कॉ. दिलीप वारके म्हणाले की, प्रथम आपण कामगार आहोत याची खंत न बाळगता लाल बावट्याचा झेंडा हातात घेऊन संघटित झाले पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून सरकारी सुविधा मिळविल्या पाहिजेत. बांधकाम कामगारांनाच या सुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून संघर्ष करणारी CWFI ही देशातील प्रमुख संघटना आहे. आपण सर्व कामगार या संघटनेचे सभासद आहात ही तुमच्या कुटुंबाच्या हिताची गोष्ट आहे. याच्यापुढेही ही बांधिलकी सांभाळावी. या कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आपली कोणतीही फसवणूक होणार नाही याची खात्री मी देतो. आमच्या कामगार संघटनेत एजंटगिरीला थारा दिला जात नाही. सध्या मी आपल्याबरोबरच ग्राम पंचायत कामगारांचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहे. सिटू संघटनेच्या माध्यमातून ग्राम पंचायत कामगारांचे प्रश्न मार्गी लागतं आहेत तरी आपण सर्वांनी संघटना मजबूत करावी, असे आवाहन केले. यावेळी मलगोंडा घाटगे व वैशाली धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शाखा अध्यक्ष संतोष काटवाळे, बंडोपंत कुंभार, रवी भोरे, विक्रम शिंदे, अनिल कुरळे, संगीता भोसले, लक्ष्मी ऐवाळे, प्रमोद सुतार व बहुसंख्य महिला व पुरुष कामगार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta