राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा : मान्यवरांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मैदानावर रविवार (ता.२२ ते बुधवार (ता.२४ ) अखेर अरिहंत उद्योग समूह, उत्तम पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने बालवीर स्पोर्ट्स क्लब यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवर महिला आणि पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उत्तम पाटील, अभिनंदन पाटील, राजकुमार सावंत व मान्यवरांच्या हस्ते झाले.
तत्पूर्वी मध्यवर्ती शिवाजी चौकातून शहरातील विविध रस्त्यावरून खेळाडू आणि मान्यवरांची मिरवणूक काढली. यावेळी उत्तम पाटील आणि अभिनंदन पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कित्तूर चन्नम्मा यांच्या पुतळ्यांना तर धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
स्पर्धेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ४० संघ सहभागी झाले आहेत.
राजकुमार सावंत यांनी स्वागत तर प्रा बाळासाहेब सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले.
उत्तम पाटील यांनी, अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकार, सामाजिक, क्रीडा शैक्षणिक आतापर्यंत भरीव कामगिरी केली आहे. ग्रामीण भागात खेळाडू निर्माण व्हावेत, या उद्देशाने विविध स्पर्धा भरविल्या आहेत. यापुढे काळातही क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी पुरुष विभागातील उद्घाटनाचा सामना वाशिम विरुद्ध हिंगोली, सांगली विरुद्ध नंदुरबार आणि पुणे विरुद्ध जळगाव यांच्यात झाला.
यावेळी सहकाररत्न रावसाहेब पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, पुष्कर तारळे, उदय पाटील, विजल शहा, सुधाकर सोनारकर, बळीराम बराडे, आनंद गिंडे, सुंदर पाटील, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, दिलीप पठाडे, शौकत मनेर, शेरू बडेघर, दत्ता नाईक, दीपक सावंत, संजय पावले, शिरीष कमते, अभय मगदूम, संगापा ऐदमळे, सतीश पाटील, राजू पाटील, इंद्रजीत पाटील, साहेबराव ठाकरे, अवधूत शेडगे, महेश राऊत, राकेश चिंचणे, इम्रान मकानदार, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, प्रा. शिवाजी मोरे, सचिन पोवार, अमर शिंत्रे, निरंजन पाटील, गजानन कावडकर, गोपाळ नाईक यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक, खेळाडू उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta