सांगली संघ उप विजेता : १४ वर्षाखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा
निपाणी (वार्ता) : येथील चॅलेंजर स्पोर्टस् ऍण्ड युथ क्लब व समर्थ व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (ता. २३) अटीतटीचा झाला. त्यामध्ये कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम संघाने विजेतेपद पटकावले. तर सांगलीच्या अनिल जोग अकॅडमीच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. कोल्हापूरच्या संघात श्रावण देसाई यांने ५६ चेंडूत ४९ धावा काढून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा मिळविला.
अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या श्रावण देसाईला मॅन ऑफ द मॅच, शुभम खोतला मॅन ऑफ द सिरीज, ओम बुरुडला बेस्ट इम्पॅक्ट, यश भिसेला बेस्ट बॉलर आणि किशोर भोसले याला बेस्ट बॅट्समन चा पुरस्कार देऊन डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी व अविनाश मानवी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत १२ संघांचा समावेश होता. ही स्पर्धा १५ दिवस सुरू होती.
डॉ. कुरबेट्टी यांनी, खेळाडूंनी हार, जीत न मानता चांगली खेळी केली पाहिजे. खेळामुळे आरोग्य तंदुरुस्त राहते. त्यामुळे युवकांनी खेळाकडे वळणे आवश्यक असल्याचे सांगितले. धनंजय मानवी यांनीही मनोगत व्यक्त केले. आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत निपाणी, बेळगाव, सावंतवाडी, सांगली, गडहिंग्लज, चिकोडी, कोल्हापूरसह इतर संघांचा सहभाग होता. श्रेयस मातीवडर व राघवेंद्र मोकाशी यांनी हे पंच म्हणून काम पाहिले.
यावेळी दीपक दुमाले, प्रथमेश लोहार, विनायक कांबळे, मोहन चव्हाण, जावेद गवंडी, विनायक महाजन, एस. बी. महाजन, अबू भडगावकर, राहुल माळवे, जावेद गवंडी, साजिद कादरी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. चंद्रकांत मोरे यांनी अंतिम सामन्याचे समालोचन केले.
Belgaum Varta Belgaum Varta