
विजापूरचा तेरदाळ द्वितीय: महाशिवरात्रीनिमित्त आयोजन
निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली मधील महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे महाशिवरात्री उत्सव सुरू आहे. रविवारी (ता.१९) सकाळी आयोजित १४ किलोमीटर अंतराच्या सायकल शर्यतीत कोल्हापूरच्या प्रतीक पाटील यांने वरील अंतर १९ मिनिटे ३७ सेकंदामध्ये पूर्ण करून प्रथम क्रमांकाचे २१ घराचे बक्षीस मिळविले.
स्पर्धेत विजापूरच्या बसवराज तेरदाळ यांने २२ मिनिटात आंतर पार करून द्वितीय क्रमांकाचे १५ हजार रुपयाचे बक्षीस पटकावले. तर गोकाकचा रवी घस्ती यांने २३ मिनिटे ७ सेकंदात अंतर पार करून तृतीय क्रमांकाचे ९ हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्रातील १४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत साजणी येथील सृष्टी कुंभोजे आणि रेंदाळ मधील श्रावणी घोडेश्वर या दोन युवतीने सहभाग घेऊन अर्धा तासात शर्यतीचे अंतर पार केले. त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून के. एस. पाटील, वाय. बी. हंडी, पी.एम. माने, वृषभ देसाई चंद्रकांत चौगुले, एस. एल. पाटील यांनी काम पाहिले.
प्रारंभी राजेश पाटील व मान्यवरांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन झाले. तर विजेत्यांना शिवरात्री महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुनील पाटील, समीर बागेवाडी, राजेश पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे, डॉ. महेश ऐनापुरे व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष माजी सभापती सुनील पाटील, संजय मोळवाडे, राजू पाटील, रवींद्र कोठीवाले, अरुण भोसले, महादेव पाटील, महेश दिवाण, बाळू जाधव, रवींद्र शेट्टी, विनोद पाटील, रोहित पाटील, बाळकृष्ण वसेदार, मल्लिकार्जुन गडकरी, निखिल चंद्रकुडे, चंद्रकांत चौगुले यांच्यासह महाशिवरात्री उत्सव कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta