Share
निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून निपाणी येथील श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर- सरकार उपस्थित होते.
आप्पाचीवाडी येथील युवकांनी रायगड येथून आणलेल्या शिव ज्योतीचे स्वागत करण्यात आले.
मदास कोकणे यांनी स्वागत केले. त्यावेळी मान्यवरांनी हालसिद्ध नाथांचे दर्शन शिवाजी महाराजांच्या पाळण्याचे पूजन झाले. श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते शिवप्रतिमा व भगव्या ध्वजाचे पूजन करून भगवा ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर महिलांनी पाळणा सादर केला. सुंटवडा वाटून सोहळ्याची सांगता झाली. यावेळी काकासाहेब कोकणे, विशाल पाटिल (नाना), वैभव पोटले, सागर हिंग्लजे, शुभम खोत, रामदास कोकणे, अभिजित माळी, दिपक पटेकर, चेतन तेली, प्रसाद पोटले, दिपक हेरवाडे, सुशांत खोत, श्रीराम माने, तुषार हिंग्लजे, सदानंद कोकणे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
Post Views:
369
Belgaum Varta Belgaum Varta