निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलच्या १५ विद्यार्थ्यांनी ‘स्केटिंग मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांना पालक मेळाव्यात पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
प्राचार्य चेतना चौगुले यांनी, अंकुलम इंग्लिश मिडियम स्कूलची क्रिडो सोबत भागीदारी आहे. त्यांच्या शैक्षणिक पद्धतीनुसार शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. क्रियाकलाप आधारित शिक्षण पद्धतीवर भर असूऊ याचा उपयोग पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना होत आहे. यासाठी शाळेमार्फत विविध मुलांना विविध मंडिल्यू, नक्ते, साचे पुरविले जातात. त्यातून मुलांना प्रात्यक्षिके करण्याची संधी दिली जात असल्याचे सांगितले.
यावेळी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कलागुणांचे सादरिकरण पालकांना करून दाखविले.
दिलीप पठाडे यांनी, एक वर्षाच्या कालावधीत उत्कृष्टरित्या शैक्षणिक दर्जा वाढवून नावारूपास आलेली शैक्षणिक संस्था म्हणून शाळेचा गौरव केला.’स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये सहभाग घेवून यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना दिलीप पठाडे हस्ते मेडल्स व पारितोषिक देण्यात आली. कार्यक्रमास संचालक डॉ. उत्तम पाटील, व डॉ. जोतिबा चौगुले, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले, किडो टिम सभासद हर्षिणा जग, विजय कांबळे, स्क्रेटिंग शिक्षक इंद्रजीत मराठे, अर्पिता कुलकर्णी यांच्यासह संचालक शिक्षक व पालक उपस्थित होते. प्रियांका भाटले यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta