Share
निपाणी (वार्ता) : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील आभाळमाया या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निपाणी येथील रहिवासी आणि अर्जुनी येथील विद्यामंदीरचे शिक्षक नामदेव चौगुले यांना शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात देवून गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायतच्या शिक्षण सभापती रसिका पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी अआशा उबाळे, आभाळमायाच्या संस्थापिका लक्ष्मी पाटील, बाजीराव पाटील यांची उपस्थिती होती.
आभाळमाया संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहून उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या विद्यार्थीप्रिय शिक्षकांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो.
नामदेव चौगुले यांनी प्रयोगशिल उपक्रम राबवून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक संस्था, संघटना यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आभाळमाया संस्थेच्या वतीने त्यांच्या कार्याची नोंद घेवून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविले आहे.
यावेळी लक्ष्मी पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून आभाळमाया या संस्थेस मोहन भोसले, नामदेव चौगुले, ग. ल. कुंभार यांनी देणगी स्वरूपात मदत दिली. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.
Post Views:
580
Belgaum Varta Belgaum Varta