Saturday , March 7 2026
Breaking News

हंचिनाळ येथे 25 जणांना डेंगू सदृश्य आजाराची लागण

Spread the love

 

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कोगनोळी : हंचिनाळ तालुका निपाणी येथील सुमारे 25 जणांना डेंगूसदृश आजाराची लागण झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गेल्या दोन तीन दिवसापासून थंड तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. कागल बेनाडी व निपाणी आदी गावामध्ये हंचिनाळातील रुग्णावर उपचार करण्यात येत आहे. नेमकी ही लागण कशामुळे झाली हे कारण अद्याप समजलेले नाही. लागण झालेल्या कुटुंबामध्ये घरातील एक दोन व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आला उन्हाळा, वाहनांना सांभाळा!

Spread the love  वाढत्या तापमानामुळे आग; स्वतःसह वाहनांची घ्या काळजी निपाणी (वार्ता) : यंदा फेब्रुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *