निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बुधवारी (ता. 8) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शमहिला पालकांना आमंत्रित करून मातृ वंदना उपक्रम राबविण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून महिला रोग तज्ञ डॉ. उत्तम पाटील, प्रतिभा पाटील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना आपल्या आईबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त व्हावा या उद्देशाने मातृ वंदना कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मातेची पाद्यपूजा केली. ’मातृवंदना अर्पण करून मातृदेवतेचे आशिर्वाद घेण्याचा हा भावूक झाला.
प्राचार्या चेतना चौगुले यांनी, स्त्री’ ही शक्ती आहे. तो कधी कन्या, कधी बहिण, कधी पत्नी म्हणून आपले कर्तव्य बजावत असते. परंतु या सर्वांच्या आधी ती एक जन्मदात्री आहे. ’माता’ म्हणून निसर्गाने तीचा गौरव तर केलेला आहेच. पण तिला खंबीर आणि सक्षमही बनविल्याचे सांगितले.
डॉ. प्रतिभा पाटील यांनी, पौगंडावस्था, शरिरातील बदल व यासंदर्भात योग्य काळजी घेण्याचे आवाहन करून महिलांच्या शंकांचे निरसन केले.
यावेळी मनोरंजनासाठी रॅम्प वॉक, पारंपारिक वेशभूषा व इतर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. विजेत्यांना भेटस्वरूपात बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकाठी शाळेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले, समन्वयिका अर्पिता कुलकर्णी, मारुती महाजन, नाझनिन शेख, भाग्यश्री शिंदे, निकिता ऐवाळे, ज्योती चवई, पुजा वसेदार, ओसिया शहा, स्वाती पठाडे, साधना शेडण्णावर, शिल्पा तारळे यांनी परिश्रम घेतले. प्रियांका भाटले यांनी संचालन तर माधूरी लोळसुरे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta