सत्ताधारी- विरोधक आक्रमक
निपाणी (संजय सुर्यवंशी) : येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा दिवंगत नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे सभागृहात मंगळवारी (ता.13) सकाळी झाली. सुरुवातीपासूनच गोंधळाच्या वातावरणात सभेला सुरुवात होऊन विषयपत्रिकेवरील सर्वच 26 विषयावर चर्चा न करता गोंधळातच सर्व विषयांना मंजुरी घेऊन सत्ताधार्यांनी दीड तासातच सभा आटोपती घेतली. यावेळी मुन्सिपल हायस्कूल सरकारला हस्तांतरण करण्याच्या विषयावरून सत्ताधारी विरोधक आक्रमक होऊन चांगलाच गोंधळ उडाला.
प्रारंभी आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी स्वागत केले. सभे समोरील विषयांचे वाचन सुरू होताच सत्ताधारी गटाने मंजूर मंजूर म्हणत पहिल्या दहा विषयांना मंजुरी दिली. त्यानंतर नगरपालिका हायस्कूल हस्तांतराचा विषय येताच सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी दोन्ही गटाचे नगरसेवक एकमेकावर तुटून पडत होते. त्यामुळे सत्ताधारी गटाने सर्वच विषयांचे वाचन न करता सर्व विषय मंजूर म्हणत सभा आटोपती घेतली. त्यानंतर दोन्ही गटातर्फे समांतर बैठका घेऊन आपली बाजू मांडली. सभेत फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव वाचणे, यावर्षीच्या एप्रिल ते महिन्यापर्यंत झालेल्या जमाखर्चावर चर्चा करून मंजुरी घेणे, एसटीपीसाठी जागेबाबत विचार करून मंजुरी घेणे, शहराला पाणीपुरवठा करणार्या जवाहर तलावामधील साचलेला गाळ काढण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, आश्रय योजनेतून घरकुल न निर्मिती होणारी यमगर्णी हद्दीतील जागा बदलण्याबाबत निर्णय घेणे, विविध योजनेतून मंजूर झालेल्या कामांसाठी आलेल्या कमीत कमी किमतीच्या निविदांवर विचार करून मंजुरी घेणे, 2021-22 सालासाठी व एसएफसी, एससीपी, टीएसपी अनुदानावर विचार करून मंजुरी घेणे, 15 व्या वित्त आयोगातील अनुदानाबाबत विचार करून निर्णय घेण्याचा ठराव सत्ताधार्यांनी मंजूर केला.
सर्वे क्रमांक 14 नांगनूर हद्दीतील जागा तालुका क्रीडांगण बांधण्यासाठी क्रीडा विभागाला पत्र देण्याबाबत चर्चा, राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी चर्चा करून निर्णय घेणे, शहरात विविध ठिकाणी रस्त्याशेजारी फलक उभारण्याबाबत चर्चा तसेच आयडीएसएमटी निधीतून शहरातील विविध ठिकाणी व्यावसायिक गाळे उभारण्यासाठी चर्चा बेंगलोर बालभवन सोसायटीच्यावतीने जवाहरलाल तलाव परिसरात बालभवन व लहान मुलांसाठी मिनी ट्रेन सुविधा उभारण्याबाबत विचार करून मंजुरी घेणे, घनकचरा निर्मूलन प्रकल्प खाजगी एजन्सीना चालविण्यास देणेबाबत चर्चा करण्यात येणार आहे. घरफाळा वसुली सोईस्कर करण्यासाठी नगरपालिकेत कर विभागात सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात करण्याचा ठरावही झाला.
सन् 2021-22 सालासाठी नगरपालिकेच्या 24 टक्के, 725 व 5 टक्के मधील कृती आराखडा विचार करून मंजूर करणे, 201 920 च्या एसएफसी 5 टक्के योजनेच्या कृती आराखड्यातील बदलावर विचार करून निर्णय घेणे, टॅक्स कन्सल्टंट व पीएफ कन्सल्टंट नेमणूक, बस स्थानक परिसरात छत्रपती संभाजी महाराज पुतळा, गांधी चौकात महात्मा गांधींचा पुतळा बसवणे शहरात स्विमिंग पूल बांधणे डिग्री महाविद्यालयासाठी जागा देणे मुन्सिपल हायस्कूलजवळील जागा दोन अंगणवाडी शाळा बांधण्यात करता देणे यासह विषयपत्रिकेवरील सर्वच 26 विषयांना सत्ताधार्यांनी मंजुरी घेतली. यावेळी पहिल्या काही झालेल्या विषयांमध्ये नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती सद्दाम नगरजी यांच्यासह सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांनी सहभाग घेतला.
Check Also
गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …