Wednesday , March 4 2026
Breaking News

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे

Spread the love
प्रा. शिरगावकर, निपाणीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुक प्रक्रियेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. त्यामध्ये निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत चिकोडी येथील आरडी महाविद्यालयातील प्रा. शिरगावकर यांनी व्यक्त केले. निपाणीत निवडणूक अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी प्रा. शिरगावकर बोलत होते.
प्रा. शिरगावकर म्हणाले, मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पहिल्या सत्रात मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली आहे. त्यातील त्रुटी लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी विविध समित्या व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी. याशिवाय उमेदवार आणि कार्यकर्त्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट हाताळण्याबाबतची माहीती आणि प्रशिक्षण दिले.दोन सत्रात हे प्रशिक्षण पार पडले.  प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्पय्यात व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आदींची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. मतदार यादीतील आपला अनुक्रमांक, यादीतील भाग क्रमांक आदींबाबतची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *