Friday , March 6 2026
Breaking News

निपाणी उपनगरातील नळांना गढूळ पाणी

Spread the love
पाण्याला येत आहे दुर्गंध : ३ दिवसांपासूनचा प्रकार
निपाणी (वार्ता) : शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या काही जलवाहिन्यां नादुरुस्त झाल्याने काही वॉर्डात नळांना गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी त्याची दखल घेऊन नगरपालिकेने जलवाहिन्यांची दुरुस्ती केली आहे. त्यानंतर आता उपनगरातील शाहूनगर परिसरातही असाच गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मागील २ दिवसांपासून हा प्रकार सुरू असून, पाण्यातून दुर्गंध येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. यातून आता शुद्ध पाणी मिळू लागले आहे. मात्र सद्य:स्थितीत उपनगरातील काही भागात गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक अडचणीत आले आहेत.
जवाहर तलावा जवळील मोठी पाईपलाईनसह शहरातील काही ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली होती. त्यामुळे या काळात गढूळ पाणीपुरवठा होत होता. आता त्याची दुरुस्ती झाली असताना उपनगरात नळाला गढूळ पाणी येत आहे. पाणी गढूळ असतानाच त्यातून दुर्गंध येत असल्याने प्यायचे सोडून त्याचा अन्य कामांसाठी वापर करतानाही नागरिकांना किळस येत आहे. त्यामुळे करायचे तरी काय, असा प्रश्न नागरिकांना पडला असून जलवाहिनीची गळती शोधून त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
——————————————————————-
अन्यथा आरोग्याच्या तक्रारी वाढणार
मागील २ दिवसांपासून शाहूनगर, आश्रयनगर व परिसरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत असल्याने नागरिकांना त्याचा वापर कसा करावा, असा प्रश्न पडत आहे. शिवाय या दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करीत राहिल्यास आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.
——————————————————————-
‘नागरिकांच्या तक्रारी पाहता गढूळ पाण्याचा शिरकाव कोठून होत आहे. याचा शोध घेणे सुरु आहे. मात्र नेमका हा प्रकार कोठून घडत आहे. हे समजले नाही. तरीही पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी जागोजागी शोध घेत असून लवकरच ही समस्या सोडविली जाईल.’
– जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव के. एस. पाटील हायस्कूलमध्ये दहावी विद्याथ्यर्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बोरगाव शिक्षण संघाच्या के. एस. पाटील माध्यमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *