निपाणी : बेनाडी (ता. निपाणी) येथील ग्रामदैवत प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा सोमवार दिनांक 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर अखेरपर्यंत भरणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक सात वाजता भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केले आहे. यासाठी तीन किलोमीटर अंतरासाठी मोफत प्रवेश. तर पाच किलोमीटर अंतरासाठी प्रवेश फी एक्कावन्न रुपये आहे. ओपन पुरुष गटासाठी अनुक्रमे 5001 व ट्रॉफी 3001 ट्रॉफी 2001 ट्रॉफी तर ओपन महिला गटासाठी अनुक्रमे 3001 व ट्रॉफी 2001, ट्रॉफी 1001 व ट्रॉफी अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. दोन्ही गटातील क्रमांक 4 ते 10 पर्यंतच्या विजेत्यांना मेडल देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना ग्लुकोज फळे वाटप करण्यात येणार आहेत. सदरचे स्पर्धेचे आयोजन गावातील सर्व तरुण मंडळे. ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. रात्री आठ वाजता श्री सिद्धी एंटरटेनमेंट बेनाडी यांच्याकडून भक्ती भावांजलि हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी पहाटे श्री सिद्धेश्वर देवास रुद्राभिषेक नैवद्य व दुपारी महाप्रसाद तर रात्री पालखी मिरवणूक होणार आहे. यावेळी श्री सिद्धेश्वर भक्ताकडून आकर्षक फटाक्यांची अतिषबाजी तर फ्रेश गँग यांच्याकडून श्रींच्या मिरवणूक मार्गात पालखी आकर्षक अशी रांगोळी घालून बहारदार पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी अनुक्रमे 1 हजार एक, 701, 501 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच दुपारी दोन वाजता चित्रकला स्पर्धांचे आयोजन वय 16 वर्षाखालील स्पर्धासाठी असून यासाठी अनुक्रमे 1001, 701, 501 रुपये उत्तेजनार्थ चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी दोनशे रुपये देण्यात येणार आहेत. रात्री श्रींच्या पालखी मिरवणुकीमध्ये श्री सिद्धनाथ ब्रास बँड कंपनी सांगली व न्यू लक्ष्मी बँड कंपनी देवर कल्लोळी यांच्या बँड वाजण्याच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी पहाटे श्री लक्ष्मी देवीची ओटी भरणे कार्यक्रम होणार आहे.
रात्री साडेसात वाजता संगीत खुर्ची स्पर्धा होणार असून यासाठी अनुक्रमे 1001, 701, 501 रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. रात्री नऊ वाजता श्री लक्ष्मी देवीची पालखी मिरवणूकसह वाद्य आयोजित करण्यात आली आहे. बुधवार दिनांक 1 डिसेंबर सायंकाळी रोज शर्यती मैदान याठिकाणी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. यावर्षीही शासनाच्या आदेशानुसार कोरोना संसर्ग व विधानपरिषद निवडणूकीची आचारसंहिता यात्रेनिमित्त रात्रीच्या वेळी होणारे असल्याने करण्यात सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द आले आहेत. त्यामुळे यात्रा साधेपणाने होणार आहे.
Check Also
संकेश्वर स्थायी समिती सभापतीपदी प्रमोद होसमणी यांची निवड
Spread the love संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेची मंगळवारी बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर …