Share
राजेश कदम; निपाणीत गॅरंटी कार्डाचे वितरण
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यात यावेळी काँग्रेसचेच सरकार येणार आहे. देशात महागाईने लोक होरपळत आहेत. त्यामुळे काँग्रेस सरकारने सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी काही लोकोपयोगी योजना आणलेल्या आहेत. गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, युवनिधी यासारख्या योजना आणल्या आहेत. या योजनेमुळे सर्वसामान्य जनतेला फायदा होणार असल्याचे मत निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांनी व्यक्त केले.
येथे काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांचा प्रचार व काँग्रेस गॅरंटी कार्डचे वितरण आणि माजी नगरसेवक नंदकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित महिलांच्या बैठकीत ते बोलत होते.
सुप्रिया पाटील यांनी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जान असलेल्या काकासाहेब पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी, सध्या निपाणी मतदार संघात द्वेषचे राजाकरण केल जात आहे. बचत गटांच्या माध्यमातून व्याजाच्या पैशासाठी महिलांचे खच्चीकरण केले जात असल्याचे सांगितले.
दीपाली श्रीखंडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास युवा उद्योजक रोहण साळवे, मानवअधिकार संघटनेच्या अध्यक्षा योगिता कांबळे, वैशाली खोत, चंद्रकांत बाबर, सतीश खोत, दयानंद पाटील, कमल जगताप, दादू साळूंखे, निखिल वाईंगडे यांच्यासह कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.
Post Views:
1,221
Belgaum Varta Belgaum Varta