विनोद साळुंखे : लवकरच घेणार बैठक
निपाणी (वार्ता) : माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या नेतृत्वत गेली ३० वर्षे आम्ही कार्य करत आहोत. पण यंदा प्रा. सुभाष जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांना गृहीत धरून आपली भूमिका जाहीर केली आहे. ही भूमिका आम्हाला मान्य नसल्याने आम्ही प्रा. जोशी यांच्या गटातून बाहेर पडत असल्याची माहिती निपाणी येथील सरप्रेमी कार्यकर्त्यांनी दिली.
विनोद साळुंखे म्हणाले, प्रा. जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३० वर्षे आम्ही काम करत आहे. सरांनी २००८ पर्यंत स्वतः निवडणूक लढवली अशावेळी आम्ही सोबत होतो. २०१३ साली सरांनी आमदार शशिकला जोल्ले यांना पाठिंबा दिला यावेळीही आम्ही सर्वांनी सरांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. व शशिकला जोल्ले यांच्या विजयासाठी प्रयत्न करून केले. २०१८ साली परत जोल्ले यांच्याशी फारकत घेत माजी आमदार काकासाहेब पाटील यांना पाठिंबा दिला. यामुळे आम्हीही काकासाहेब पाटील यांच्या पाठीशी राहिलो. पण यंदा पुन्हा सरांनी काकासाहेब पाटील यांच्याशी फारकत घेत उत्तम पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यांचा प्रचार त्यांनी सुरू केला आहे. पण याबद्दल निष्ठावंत कार्यकर्त्यांना सरांनी विचारात घेतलेले नाही. कार्यकर्त्यांना गृहीत धरणे ही सरांची भूमिका न पटल्याने सर्व निष्ठावंत कार्यकर्ते सरांच्या राजकीय भूमिकेपासून वेगळी भूमिका घेत आहोत. निपाणी शहर, उपनगर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते सरांच्या भूमिकेवर नाराज असून येत्या ४ दिवसात मोठ्या प्रमाणात मेळावा घेऊन सरप्रेमी कार्यकर्ते पुढची भूमिका लवकरच जाहीर करणार आहे. पिंटू मोरे, इंद्रजित जमादार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी दिलीप कांबळे, सचिन थोरवत, वसीम मुजावर, मोहसिन पटेल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.