निपाणी (वार्ता):) : चिकोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार यांना निधर्मी जनता दलाचे निपाणी मतदारसंघांसाठी अधिकृत उमेदवारची घोषणा करण्यात आली. निधर्मी जनता दलाचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष कल्लाप्पाण्णा मगेन्नावर यांच्या निवासस्थानी ही घोषणा करण्यात आली. याप्रसंगी निपाणी निधर्मी जनता दल अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर, (भैया) सुनिता लाटकर, बबन जामदार, प्रा. हालापा ढवणे उपस्थित होते.
राजू पोवार यांनी रयत संघटनेच्या माध्यमातून निपाणी भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल आवाज उठवित देण्यासाठी प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून दिले आहे. याशिवाय अनेक आंदोलने केली आहेत.
नुकत्याच बेंगळुरू येथे पार पडलेल्या एका बैठकीत निजदने रयत संघटनांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या पार्श्वभुमीवर राजू पोवार यांना विधानसभा निवडणूकी करीता उमेदवारी देण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रयत संघटनेच्या माध्यमातून आगामी निवडणूकीत राजू पोवार निश्चितच विजयी होतील, असा विश्वास कार्यकत्यांनी व्यक्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta