
निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. सोमवार (ता.१७) पाचव्या दिवशी रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी धजद आणि रयत संघटनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी समर्थक व कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केले.
रयत संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नापा पुजारी व धजदच्या राज्यसचिव सुनिता व्होनकांबळे, निपाणी ब्लॉक अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर यांच्या उपस्थितीत चिक्कोडी रोडवरील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर चिकोडी रोड मार्गे धर्मवीर संभाजीराजे चौक, जुना पीबी रोड साखरवाडी नगरपालिकामार्गे निवडणूक कार्यालया जवळ उमेदवारासह कार्यकर्ते एकत्र जमले. त्यानंतर उमेदवार राजू पोवार यांनी पहिला अर्ज दाखल केला. त्यांना प्रसन्नकुमार गुजर, संजय पोवार यांनी सूचक म्हणून सह्या केल्या. तर दुसऱ्या अर्जाला सूचक म्हणून मयूर पोवार छबुताई पोवार, मारुती पोवार, सखाराम पाटील, चेतन पाटील, नवनाथ पोवार, सुनील पोवार, सुजाता पोवार, विश्वनाथ पोवार यांनी सह्या केल्या.
राजू पोवार म्हणाले, राज्यात माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली धजद आणि रयत संघटना यांचे सरकार येणार हे निश्चित आहे. गेल्या पंधरा वर्षापासून आपण रयत संघटनेच्या माध्यमातून निस्वार्थीपणे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. त्यासाठी अनेक आंदोलने केली आहेत. ऊस दरासाठी आंदोलने, पूरग्रस्तांसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हाती घेतल्याने धन दांड्यांच्या विरोधात लढण्यासाठी स्वाभिमानी मतदारांनी ही निवडणूख हाती घेतल्याचे सांगितले.
यावेळी रमेश पाटील, बबन जामदार, दादासाहेब कांबळे, प्रा.हालापा ढवणे, परमानंद पाटील, रमेश कोळी, दादासाहेब चौगुले, प्रीतम पोवार, बाबासाहेब पाटील, चिनू कुळवमोडे, नामदेव साळुंखे, नितीन कानडे, बाळासाहेब पाटील, चंद्रकांत सुतार, दामोदर कांबळे, शिवाजी कांबळे, महेश जनवाडे, विवेक जनवाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta