Share
मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी : सराफ बाजारात नवचैतन्य
निपाणी (वार्ता) : साडेतीन मुहुर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने खरेदीमध्ये निपाणी येथील शहरातील बाजारपेठेत शनिवारी (ता.२२) मोठी उलाढाल झाली. या दिवशी सर्वसामान्य कुटुंबियासह सर्वच वर्गातील नागरिकांनी आपापल्यापरीने सोन्या चांदीची खरेदी केली. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी येथील सराफ बाजारामध्ये उत्साह आणि नवचैतन्याचे वातावरण दिसून आले. परिणामी सराफी बाजारात खरेदीसाठी ग्राहकांनी उसळी घेतल्याने लाखो रुपयांची उलाढाल झाली.
गेले दोन वर्षे कोरोना संकटामुळे अक्षय तृतियाचा मुहूर्त खरेदीदारांना साधता आला नाही. यावर्षी सोन्याचा दर जीएसटी व्यतिरिक्त प्रति तोळा ६० हजार६०० होता. तर चांदी ७४ हजार ५०० वर आहे. तरीही अक्षय तृतीयेला सोने खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
गेल्या महिन्यापासून लग्नसराईलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे सराफ बाजारात यावर्षी उलाढाल नियमितपणे सुरू झाली आहे. अक्षय तृतीयेलाही सोने खरेदीकडे ग्राहकांचा दिसून आला. मार्च पर्यंत ५९ हजार रुपयांपर्यंत असलेल्या सोन्याच्या दराने एप्रिलमध्ये मध्ये कमी होऊन ६० हजार ६०० रुपयावर आला आहे. सध्या सोन्याच्या किमतीचा दरवाढीचा प्रवास सुरु असल्याने आणखी काही दिवसात दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुढीपाडव्यानंतर सोनेखरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल असून लग्नाचा हंगाम असल्याने बाजारपेठ खरेदीसाठी फुल्ल राहणार आहे.
—————————————————
गुंतवणुकीचा पर्याय
गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ग्राहकांचा आजही या मौल्यवान धातूवर विश्वास आहे. यंदा पाच ते १० टक्के खरेदी वाढण्याची शक्यता आहे. कर्णफुले, नेकलेस, पाटल्या बांगड्या आदी प्रकारांना अधिक मागणी आहे. सण समारंभाच्या निमित्ताने या खरेदी मध्ये वाढ होत आहे.
—————————————————
ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक
‘सोन्या चांदीचे दर वाढत असले तरी खरेदीसाठी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचा निपाणी सराफी बाजारात खरेदीचा उच्चांक होत आहे. लग्न व इतर समारंभ निमित्त सोन्या-चांदीची खरेदी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जात आहे.
—————————————————
‘ गेल्या दोन वर्षापासून सराफी बाजारपेठेतील उलाढाल जेमतेम सुरू होती. पण आता तंबाखू आणि ऊसाचे हप्ते मिळाल्याने गुढीपाडव्यापासून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. यंदा अक्षय तृतीयाला बाजार पेठेत चांगली उलाढाल झाली.’
– सुरेश शेट्टी, सराफ व्यावसायिक, निपाणी
Post Views:
795
Belgaum Varta Belgaum Varta