Share
निपाणी (वार्ता) निपाणी मतदारसंघातून आम आदमी पक्षातर्फे डॉ. राजेश बनवन्ना निवडणूक लढवत असून आपच्या प्रचारास मतदार संघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदारांचा प्रतिसाद पाहता आम आदमी पक्ष निवडणुक जिंकणार असून मतदारसंघ भ्रष्टाचार मुक्त होईल, असा विश्वास अमोल बेडगे यांनी व्यक्त केला. निपाणी शहरातून काढलेल्या प्रचार फेरीप्रसंगी ते बोलत होते
उमेदवार डॉ. राजेश बनवन्ना यांनी, निपाणीत परिवर्तनाला सुरवात झाली असून भ्रष्टाचारमुक्त निपाणी मतदार संघ आम्ही बनविणार आहोत. त्यासाठी मतदारांचे पाठबळ मिळत असल्याचे सांगितले. यावेळी वसीम पठाण, आदर्श गिजवणेकर, महेश कंगळे, रियाज बागवान, डॉ. गिरीश सर्वज्ञ, नंदकिशोर कंगळे, योगेश आवटे, राजू हिंग्लजे, हार्दिक हिंगलजे, शंकर चौगुले, तात्यासाहेब गेबिसे, संदीपआरेकर, सचिन दुपडाळे, अमोल कांबळे, प्रीती कांबळे, सुप्रसिद्ध कांबळे, विकास रानमाळे, सुशीला माने, प्रकाश रुपाळे, सूरज, कांबळे, सदाशिव पोवार, चंद्रकांत हुक्केरी, छाया लोहार, महादेवी सावंत आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views:
566
Belgaum Varta Belgaum Varta