Monday , September 21 2026
Breaking News

समितीच्या विजयासाठी मराठी भाषिकांचा येळ्ळूरातून एल्गार

Spread the love

 

बेळगाव : माय मराठीच्या अस्मितेसाठी, समितीच्या विजयासाठी येळ्ळूरात मोठ्या संख्येने एल्गार पुकारला. सर्वसामान्यांना हक्क मिळवून देण्यासाठी सदा प्रयत्नशील राहू. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला उत्तर देऊन न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कार्य करून जनतेची सेवा करू. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडून जमीन हडप करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू. मराठी भाषिक एकत्र एकवटल्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकिकरण समितीचे दक्षिणेचे अधिकृत उमेदवार श्री. रमाकांतदादा कोंडूस्कर यांनी येळ्ळूरवासियांना उद्देशून मार्गदर्शन केले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव आणि येळ्ळूरच्यावतीने समितीचे अधिकृत उमेदवार श्री. रमाकांत दादा कोंडुस्कर यांच्या प्रचार फेरीला सुरुवात झाली. प्रथमता श्री चांगेश्वरी देवीचे पूजन करून या प्रचारफेरीला प्रारंभ करण्यात आला. येळ्ळूरात महाराष्ट्र एकीकरण समितीचा मोठा झंझावात निर्माण झाला. त्यानिमित्त रमाकांत कोंडूस्कर यांची पदयात्रा हजारो संख्येने येळ्ळूर येथे रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पाडली.

येळ्ळूरमध्ये भगवे वादळ घुमले..

हजारोंच्या संख्येने रमाकांत दादा कोंडूस्कर यांच्या पदयात्रेत लढवय्ये येळ्ळूरकर सामील झाले होते. गल्ली गल्लीतून मराठी भाषिकांचा एल्गार समितीच्या विजयाची नांदी ठरत आहे. गल्ली गल्लीत व घराघरात दादांचे स्वागत करण्यात आले. “महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो” अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून गेला.
यावेळी आजी- माजी ग्रामपंचायत सदस्य, समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला भगिनी, युवक युवती, आबालावृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *