निपाणी : शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर महिना संपण्यापूर्वी घ्याव्यात असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व निवडणूक आयोगाला नुकतेच दिले होते. या अनुषंगाने 23 नोव्हेंबर 2021 रोजी नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण जाहीर केले आहे.
यामुळे बोरगाव नगर पंचायती लवकरच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया होऊ शकते. या अगोदर 17 प्रभागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र या आरक्षणात बदल व्हावे यासाठी अनेकांनी अर्ज केला होता. पण नगरपंचायत विभागीय विभागाकडून कोणतेच बदल केले नसून पूर्वीचे आरक्षण जाहीर केले आहेत यामुळे काहीमध्ये खुशी तर काहींमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे. पण ही यादी अंतिम असल्याने या आरक्षणावरूनच निवडणूक होणार आहेत.
एकूण 17 प्रभागांमध्ये जाहीर झालेले आरक्षण पाहता प्रभाग सामान्य, प्रभाग 2 मागासवर्गीय ए महिला, प्रभाग 3 सामान्य महिला, प्रभाग 4 सामान्य महिला, प्रभाग 5 मागासवर्गीय ए, प्रभाग 6 अनुसूचित जाती, प्रभाग 7 सामान्य, प्रभाग 8 मागासवर्गीय ब, प्रभाग 9 अनुसूचित जाती महिला, प्रभाग 10 अनुसूचित जात, प्रभाग 11 सामान्य, प्रभाग 12 मागासवर्गीय वर्ग अ, प्रभाग 13 सामान्य महिला, प्रभाग 14सामान्य, प्रभाग 15 अनुसूचित जमाती, प्रभाग 16 सामान्य, प्रभाग 17 सामान्य महिला असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
बोरगांव नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप व उत्तम पाटील गट हे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. निवडणुका लवकरच होणार हे निश्चित असल्याने आता खर्या अर्थाने रणधुमाळी सुरू होणार आहे.
यासाठी तारखा जाहीर होणे बाकी आहे. पण न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार डिसेंबर महिनाखेरीस मतदान होणार असून आता तारखांची औपचारिक घोषणा बाकी आहे.
एकंदरीत यंदाच दुसर्या नगरपंचायतीसाठीचा गुलाल उडणार असून यासाठी इच्छुकांनी मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरण्यास सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.
Check Also
संकेश्वर स्थायी समिती सभापतीपदी प्रमोद होसमणी यांची निवड
Spread the love संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेची मंगळवारी बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर …