Share

आमदार रोहित पाटील : निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसची सभा
निपाणी (वार्ता) : भाजपचे सरकार आल्यापासून महागाईचा आगडोंब निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. मध्यमवर्गीय सह सर्वांना संपविण्याचे षडयंत्र या सरकारने रचले आहे. जातीयवाद भडकून भांडने लावण्याचे प्रयत्न करत आहेत. कोट्यावधी रुपयांची विकास कामे केल्याचा दावा करत ४० टक्के कमिशन घेणाऱ्या भाजपा सरकारला हाकलून देऊन राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना निवडून द्या, आवाहन आमदार रोहित पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ निपाणीत आयोजित सभेचे बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक सभा जोशी होते.
आमदार रोहित पाटील म्हणाले, वारंवार महापुरुषांचे अपमान होत असून जनता खपवून घेणार नाही. येथील आमदारांना मंत्री पद मिळूनही त्यांनी संधीचे सोने न करता केवळ स्वतःची संधी साधून घेतली आहे. त्यामध्ये अंडी घोटाळा करून लाखो रुपये हडप केले. भविष्यात मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या या हमेशाला स्वाभिमानी जनतेने बळी न पडता राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
आमदार अमोल मिटकरी यांनी, आमदार मिटकरी म्हणाले, २२ हजार कोटी विकास कामांचा गावा करणारे मंत्री व खासदारांना निपाणी डोंगर भागातील गावांना पाणी समस्या का दिसत नाही?, गेल्या काही वर्षापासून उत्तम पाटील यांनी काँग्रेसमध्ये राहून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आपला संवाद ठेवला. त्यांच्या समस्या मिटविण्यासाठी काम केले. असे असताना काँग्रेस पक्षाने पाटील यांना डावलण्याचे काम केले. पण सर्वसामान्यांचा कार्यकर्ता हा निपाणी मतदारसंघाचा आमदार होणारच, यात शंका नाही.
उमेदवार उत्तम पाटील म्हणाले, १० वर्षांपासून आमदू असताना केवळ कमिशनचे राजकारण केले. सर्वसामान्य नागरिकाला शासकीय कामांसाठी मंत्र्याची शिफारस घ्यावी लागते. कोट्यावधी निधी खर्च करूनही निपाणी भागाचा औद्योगिक विकास का झाला नाही, असा सवाल व्यक्त करून या निवडणुकीत आपणाला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेवक विलास गाडीवड्डर,प्रा. सुभाष जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
सभेस माजी आमदार राजू आवळे, रावसाहेब पाटील, अभिनंदन पाटील, राजकुमार सावंत, गोपाळ नाईक, नगरसेवक बाळासाहेब देसाई-सरकार, संजय सांगावकर, सुनील पाटील, दिलीप पठाडे, शौकत मनेर, शिरू बडेघर, डॉ. जसराज गिरे, संजय पावले, संभाजी थोरवत, अरुण निकाडे, निरंजन पाटील- सरकार, गजानन कावडकर, के. डी. पाटील, मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील, विनयश्री पाटील, शुभांगी जोशी, अनिता पठाडे, शांती सावंत, माधुरी घस्ते, उपासना गारवे यांच्यासह मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views:
296
Belgaum Varta Belgaum Varta