निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडली. निपाणी मतदारसंघात चुरशीने पण शांततेत मतदान पार पडले. मात्र अकोळ येथील मतदान केंद्र क्रमांक 153 मध्ये ईव्हीएम घोटाळ्याचा संशय असून या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेस उमेदवार, माजी आमदार काका पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भातील पत्रक उमेदवार काकासाहेब पाटील आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
या तक्रारीत, अकोळ येथील मतदान केंद्र क्रमांक 153 मध्ये प्रत्यक्षात 667 मतदारांनी मतदान केले आहे. मात्र ईव्हीएम मशीनमध्ये 718 जणांनी मतदान केल्याचे दाखवत आहे. त्यामुळे वाढीव 51 मध्ये कुठून आली किंवा कोणी मतदान केले याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे या मतदान केंद्रावर फेरमतदान घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे केली आहे, अशी माहिती पाटील व चिंगळे यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta