
बोरगाव प्रीमियर लीगचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास येत आहेत. कोणतेही प्रशिक्षण नसताना ग्रामीण भागात होतकरू खेळाडू पहावयास मिळत आहेत. अशा खेळाडूंना शासनाकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. खेळाडूंच्या अंगी असलेले विविध गुण आपण ओळखून अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक गावात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करीत आहोत. तालुक्यातील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असून भविष्यात खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी मी सदैव पाठीशी उभा असल्याचे मत बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
बोरगांव क्रिकेट क्लबतर्फे आयोजित बोरगाव प्रीमियर लीग स्पर्धेचे उद्घाटनाप्रसंगी उत्तम पाटील बोलत होते.
अनुज हावले यांनी, बोरगाव येथे प्रत्येक वर्षी विविध क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. या ठिकाणी खेळणारा खेळाडू हा राष्ट्र पातळीवर जावा ही आपली सदिच्छा असून खेळाडूंना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
क्लबचे अध्यक्ष अनिल इंगळे यांनी, लीग पद्धतीने सर्व सामने खेळविण्यात येणार आहेत.निपाणी व चिकोडी तालुक्यातील खेळाडूंचा या सामन्यात सहभाग आहे. विजेत्या संघांना २१ हजार, १५ हजार व ११ हजार रुपयांचे बक्षीस व चषक देण्यात येणार आहे.
यावेळी सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एच. भरतगौडा, नगरसेवक अभय मगदूम, प्रदीप माळी, रोहित माने, तुळशीदास वसवाडे, पीकेपीएसचे संचालक सुमित रोड्ड, राजेंद्र ऎदमाळे, दर्शन पाटील, सुरेश बंकापूरे, शरद सातपुते, इंद्रजित पोवार, माजी नगराध्यक्ष संगप्पा ऐदमाळे, उल्हास निकम, संतोष वडेयर, श्रेणिक जंगटे, राजू कुडचे, राजू तेरदाळे, भीमा चौगुले, सतिश बडीगेर, बबन बसन्नावर यांच्यासह चिकोडी व निपाणी तालुक्यातील खेळाडू उपस्थित होते. धैर्यशील खरात यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta