Monday , December 8 2025
Breaking News

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा

Spread the love

 

जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन : हिंदू बांधवातर्फे निपाणीत मूक मोर्चा

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संभाजीनगरात घडलेला प्रसंग सोशल मेडियावर आक्षेपार्ह स्टेटस पोस्ट करून समाजात अशांतता निर्माण करण्याचा काही समाजकंटकांनी प्रयत्न केला अशा संबंधीत समाजकंटकावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून सामाजिक सलोखा बिघडवू पाहणारी प्रवृत्तीचा वेळीच बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.९) सायंकाळी निपाणी मधील समस्त हिंदू समाजातर्फे शहरातून मूक मोर्चा काढून तहसीलदार विजय कडगोळ यांच्यामार्फत जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, निपाणी शहर हे शांततेची शिकवण देणारे आदर्श शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळयाचे औचित्य साधून कांही समाजकंटकानी सोशल मेडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समस्त हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरीही समाज बांधवांनी संयम पळून शांततेने मूक मोर्चा काढला आहे.
समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करणे चुकीचे आहे. असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना पोलीस प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करून त्यांचेवर कठोर कारवाई करावी. याशिवाय सदरचे हे कृत्य करण्यामागच्या षडयंत्राची पोलीसांनी सखोल चौकशी करून तपास करावा. यापुढील काळात असे कृत्य निपाणीसह संपूर्ण कर्नाटकात घडू नये, याची खबरदारी घ्यावी.
प्रारंभी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यास मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या हस्ते जलाभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर हिंदू धर्म की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, भारत माता की जय अशा घोषणा झाल्यानंतर ध्येय मंत्र सादर करण्यात आले. येथील मध्यवर्ती शिवाजी चौकातून मूक मोर्चाला प्रारंभ झाला. तेथून कन्या शाळा, चाटे मार्केट, नगरपालिका कार्यालय, जुना पीबी रोड मार्गे हा मोर्चा तहसीलदार कार्यालयाजवळ पोहोचला. यावेळी समस्त हिंदू बांधवा तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बाळासाहेब कळसकर यांनी निवेदनाचे वाचन केले. तहसीलदार कडगोळ यांनी यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. चिक्कोडीचे पोलीस उपधीक्षक बसवराज येलीगार यांनी हिंदू समाज बांधवांनी अशाच प्रकारे शांततेचे सहकार्य द्यावे. समाज माध्यमावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट आल्यास ती इतरत्र व्हायरल न करता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याचे संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद पुजारी, उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांच्यासह निपाणी व परिसरातील हिंदू समाज बांधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *