निपाणी इचलकरंजी मार्गावरील घटना : अधिकाऱ्यांच्या आश्वासननंतर रास्ता रोको मागे
निपाणी (वार्ता) : लखनापूर अकोळ गळतगा या रस्त्यावर स्पीड ब्रेकर अभावी अनेक लहान मोठे अपघात घडत असून दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आठ मूक जनावरांचा बळी या रस्त्याने घेतला आहे. या रस्त्याला लागूनच घरे, शाळा, दुकाने आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी स्पीड ब्रेकर निर्माण करावेत या मागणरसाठी आज लखनापूर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. या ठिकाणी दोन ते तीन स्पीड ब्रेकर करावेत, यासाठी यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. नागरीकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने येथे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मर्गावरून भरधाव वाहने येत असल्याने नागरीकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून जावे लागत आहे.
यावेळी बोलताना दलित क्रांती सेना अध्यक्ष अशोककुमार असोदे म्हणाले, पीडब्ल्यूडी अधिकारी बेडकीहाळे यांनी गावातील सुखसुविधाकडे कोणत्याही प्रकारे लक्ष दिले नाही. गावातील नागरिकांच्या मागण्या कडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बेडकीहाळे यांची बदली करावी अशी मागणी करत ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच स्पीड ब्रेकरची आमची मागणी लवकर मान्य केली नाही तर आठ दिवसानंतर या रस्त्यावर जेसीबीने खड्डा काढण्यात येईल. असा इशारा ग्रामस्थांनी दिला. रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यानंतर जवळपास चार ते पाच तास रास्ता बंद करण्यात आला होता. यावेळी वाहनाच्या लांब रांगा लागल्या पाहायला मिळाल्या. बसवेश्वर पोलीस ठाण्याचे पीएसआय रमेश पवार यांनी या ठिकाणी भेट देऊन नागरिकांचे समजूत काढली. त्यानंतर रस्ता पूर्ववत करण्यात आला.
यावेळी अनिल नाईक, दयानंद भराडे, मल्लिकार्जुन शिंदे, विनायक पाटील, भारत शितोळे, बाळगोंडा भोसले, संतोष केसरकर, सुनील कांबळे, नारायण सूर्यवंशी, अरुण भोसले, सुनील शितोळे, बाळकृष्ण शिंदे, लिंगराज पाटील, गणेश लोकरे, सिद्धार्थ नाईक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.