Saturday , March 7 2026
Breaking News

मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव यांचा सेवनिवृत्ती निमित्त सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात प्रदीर्घ सेवा बजावणारे मुख्याध्यापक बाळासाहेब शंकर जाधव यांचा सेवनिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रोपटे व सन्मानपत्र देऊन जाधव दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी शिक्षक प्रतिनिधी आर. आर. कपले यांनी स्वागत केले. मुख्या ध्यापिका एस. एम. गोडबोले, जेष्ठ शिक्षक आर. डी. पाटील, एस. बी. यादव, एस. बी. वारके, व्ही. के. परीट, धनश्री पोकले, समीक्षा जाधव, श्रावणी संकपाळ, ज्ञानेश्वरी पोवार, अनुजा जाधव यांनी मनो गतातुन आठवणी सांगून शुभेच्छा दिल्या.
सत्कार बद्दल कृतज्ञता व्यक्त करून जाधव म्हणाले, प्रत्येकाने आपल्या आई वडीलांवर प्रेम करून त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. आपल्याला यश हे नशीबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे मिळते त्यासाठी चांगल्या संगतीत राहून प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी जेष्ठ शिक्षिका एस. बी पाटील, कर्मचारी प्रतिनिधी बी. एल. तिप्पे, उषा जाधव, आशुतोष जाधव, ज्योती जाधव, अनुजा जाधव जुईली जाधव यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. एस.के. बुच्चे यांनी सूत्रसंचालन केले. एन. जे. खेबुडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्यासह संचालक मंडळाचे प्रोत्साहन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

आला उन्हाळा, वाहनांना सांभाळा!

Spread the love  वाढत्या तापमानामुळे आग; स्वतःसह वाहनांची घ्या काळजी निपाणी (वार्ता) : यंदा फेब्रुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *