Monday , December 8 2025
Breaking News

गाळ काढल्याने तलावात होणार मुबलक पाणीसाठा : आमदार शशिकला जोल्ले

Spread the love

 

जवाहर तलावातील गाळ उपशाला प्रारंभ

निपाणी (वार्ता) : पाण्याशिवाय जगणे कठीण असल्याने पाण्यासाठी वृक्षारोपण पाणी आडवा पाणी जिरवा, असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. शहरवासीयांच्या पाण्यासाठी जवाहर तलावाची निर्मिती झाली होती. पण वाढती लोकसंख्या आणि तलावात साठलेला गाळ यामुळे यंदा पाणीटंचाई जाणवली. ती दूर करण्यासाठी आता महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने तलावातील गाळ उपसा केला जात आहे. जवाहर तलावात दुप्पट पाणीसाठा होणार असून यापुढील काळात कधीही शहरवासीयांना पाणीटंचाई जाणवणार नाही, असे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. येथील जवाहर तलावातील गाळ उपशाचा प्रारंभ मंगळवारी (ता.२७) सकाळी करून त्या बोलत होत्या. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
आमदार जोल्ले म्हणाल्या, १९२३ साली ढोर वाड्यातील विहिरीचे पाणी विकत घेऊन शहराला पाणीपुरवठा केला. त्यानंतर दुसऱ्या वर्षी शिरपूर ते हद्दीतील ओढा रुंद करण्यासह आम्ही येथे तीन विहिरी, जलकुंभाला नळ जोडून पाणीपुरवठा केला होता. त्यानंतर सहा लाख रुपये खर्चून जवाहर वॉटर वर्क सुरू केला होता. १९५१ मध्ये जवाहर तलावाचा पायाभरणी मोरारजी देसाई यांच्या हस्ते केला होता. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही या कामाची पाहणी केली होती. पण वाढती लोकसंख्या आणि गाळाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी त्यांच्या निर्माण झाले आहे ही बाब लक्षात घेऊन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून महामार्ग प्राधिकरणच्या सहकार्याने तलावातील १८ फुट गाळ मोफत काढण्यात येणार आहे.त्यामुळे पुढील वर्षाच्या पाणी साठ्यात दुपटीने वाढ होणार आहे. आपल्यावर टीका होत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून आपण काम करून दाखवीत असल्याचे उत्तर जोल्ले यांनी विरोधकांना दिले.
खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी, मधील गाळ काढण्यासाठी निधी मंजूर झाला असून तो खर्च झाल्याचा अपप्रचार सुरू आहे. तलावासाठी चार कोटी रुपयाच्या निधीचा आराखडा मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यामधून तलाव विकासासाठी २.९० लाख, हवेली तलावाचा दुरुस्तीसाठी ३०, राजा शिवछत्रपती संस्कृतीक भवनासाठी ३५ लाख, बाळूमामा नगरातील उद्यानासाठी २५ लाख आणि लोकमान्य टिळक उद्यानाच्या विकासासाठी वीस लाख रुपयांचा समावेश आहे. गाळ काढताना पाऊस झाला तरीही नवीन तंत्रज्ञानुसार पाण्यातून गाळ काढला जाणार असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी, जव्हार तलावावरील वाया जाणारे पाणी बंद केले असून त्याचा वापर सुरू केला आहे. एमडीआर सह विविध ठिकाणच्या गळत्या काढल्या आहेत. दोन नवीन प्रेशर फिल्टर बसवून पाणी सुरू केले आहे. १२ ऐवजी१८ इंच पाण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याशिवाय तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी वीज मिळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडे टॉवरची मागणी केली असून लवकरच त्याचीही पूर्तता होणार आहे. पाणी साठ्यासाठी तीन ओव्हर हेड टॅंक निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगितले. जगदीश हुलगेज्जी यांनी तलावातील तलावातून काढणाऱ्या गाळच्या विल्हेवाटी बाबत माहिती दिली. प्रारंभी आमदार शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते गाळ काढणी कामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, हाल शुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, अमित साळवे, सुरेश शेट्टी, सुनील पाटील, प्रताप पट्टणशेट्टी, संतोष सांगावकर, दत्ता जोत्रे, प्रणव मानवी, रवी कदम, अभय मानवी, राजेश कोठडीया, अमर उपाध्ये, सोनाली उपाध्ये, दीपक माने, विजय टवळे, प्रवीण कणगले, लक्ष्मीकांत शिगीहळ्ळी, प्रशांत केस्ती, प्रसाद औंधकर, रोहित वैद्य, महादेव चव्हाण, अनुज कमते, विशाल बुडके, एस. के. खज्जनावर यांच्यासह शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *