निपाणी(वार्ता) येथील अर्जुननगर(ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक नानासाहेब जामदार हे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शुक्रवारी (ता.३०) सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
प्रा. नानासाहेब जामदार यांनी आतापर्यंत कारवार, कणकवली, निपाणी अशा विविध ठिकाणी एकूण ३५ वर्षे ज्ञानदानाचे काम केले आहे. येथील देवचंद महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. याशिवाय मराठी युवकभारती पाठ्यपुस्तक, पुणे येथील प्रमाण लेखन व व्याकरण कार्यशाळा, कणकवली कोल्हापूर सातारा सांगली साधन व्यक्ती म्हणून व्याख्यान, १२ वी साठी ॲप निर्मितीमध्ये व्याकरण सल्लागार, संपादन मंडळावर सदस्य विषय तज्ञ म्हणून काम केले आहे. याशिवाय गुरु स्मृतिगंध, प्रा. पी. डी. गुमास्ते स्मृती ग्रंथ, नादब्रह्म, डॉ. आर. एन. कुलकर्णी स्मृतिगंध अशा ग्रंथांचे संपादन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta