संकेश्वर (प्रतिनिधी) : माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती हे हुक्केरी विश्वनाथ भवन येथील कार्यक्रमाला निघाले असता हुक्केरी बायपास रस्त्यावर विवेकानंद शाळेची बस रस्त्याच्या कडेला सिक्ड होऊन थांबलेली दिसताच रमेश कत्ती शालेय मुलांच्या मदतीला धावून गेले. शाळेची बस रस्त्या शेजारच्या खड्ड्यात उतरल्याने त्यांनी प्रथम बसमधील मुलांना सुखरुप खाली उतरविले. रस्त्यात बस खोटी होऊन थांबल्याने शालेय मुले शाळेचा तास चुकणार याच काळजीत होती त्यांना धीर देवून ताबडतोब दुसर्या बसची व्यवस्था करुन मुलांना शाळेला पाठवून देण्याचे कार्य रमेश कत्ती यांनी केले. यामुळे खुश झालेल्या मुलांनी सावकारांना थँक्स म्हणत बाय बाय केला. माजी खासदार रमेश कत्ती हे अडचणीत सापडलेल्या लोकांच्या, मुलांच्या मदतीला धावून जाणारे नेते असल्याची चर्चा होताना दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta