निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावरील हॉटेल अमर नजीक धोकादायक वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ग्लुकोज केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. या अपघातात सुमारे ६० लाखाचे नुकसान झाले. यामध्ये चालक चमन नंदीगावी (वय ३४ रा. मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवारी (ता.४) रात्री बाराच्या सुमारास झाला. घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, चालक चमन हा शिरसी (कारवार) येथून मुंबई येथे ग्लुकोज केमिकल घेऊन जात होता. त्याचे वाहन वेगात असल्याने हॉटेल अमरनजीक धोकादायक वळणावर चालक चमन याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टँकरची दुभाजकाला धडक बसून तो रस्त्यातच पलटी झाला. घटनास्थळी उपनिरीक्षिक उमादेवी यांनी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta